Posts

'धाव'पळ'

संपल्यात हद्दी, संपल्यात वाटा, कितीही धावता, मी दमलोच नाही; धावण्याचा असा उन्माद झाला, बाकी आमिषास, मी भ्रमलोच नाही; ​असा झिजला देह, नाही उरले त्राण, कुठल्याही त्रासास, मी नमलोच नाही; ​नसे मनात काही, कुठलीच स्पर्धा, कुणा हरविण्या, मी रमलोच नाही; ध्येय गाठूनी ​आजचे, पुन्हा सुरुवात, धावण्यास ध्येयामागे, मी थांबलोच नाही. - धीरज (१७-०९-२०२५)

असंच

कधी नव्हे ते आज शब्दांशी हितगुज करता, कवितांची रिमझिम सुरू झाली; भिजलेले शब्द नकळत, मनाच्या कानाकोपऱ्यातून वाट काढत, वाहत, आठवणींच्या नदीकाठी केव्हा जाऊन पोहचले कळलेच नाही! - धीरज

Running dilemma

To be or not to be that's the question, पळावे की नाही पळावे हा एकच सवाल आहे, टाऊनस्क्रिप्टच्या उकिरड्यावर शोधत रहाव्यात नवनवीन मॅरेथॉन इव्हेंट्स बेशरम लाचार आनंदाने, की फेकुन द्यावे ते बीब, गुडी बॅगमध्ये गुंडाळलेल्या टीशर्टसह, कचर्‍याच्या टोपलीत आणि विसरून जावे सर्व इवेंट्स, मुंबईचे, दिल्लीचे आणि पुण्याचेसुद्धा...! इंजुरीच्या महासर्पाने असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या इवेंटचा विसर पडावा कायमचाच, पण मनातल्या रनरलाच PB ची स्वप्न पडू लागली तर...? इथेच मेख आहे... नवीन रेकॉर्ड करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो रात्रीच जागेपण, सहन करतो इझीच्या नावाखाली होणारे रविवारचे लाँग टेम्पो रन, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने पायांवर होणारे अत्याचार, गार्मिनच्या अल्गोने सत्वाची होणारी रोज विटंबना, आणि अखेर खूप साऱ्या इंजुरी घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आपल्याच कोचच्या दाराशी! विधात्या, तू इतका कठोर का झालास, एका बाजूला ज्यांना इंस्टावर फॉलो करून आम्ही रनिंग सुरू केली, ते जिमर झाले, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या नंतर रनिंग सुरू करणारे अल्ट्रा करू लागले, तर स्ट्रावाच्या विस्कटलेल्या शेकडो ॲक्...

जागतिक कॉमेंट्स वाचक संघटना (WCRA - वक्र)

जागतिक कॉमेंट्स वाचक संघटना (WCRA - वक्र) याचा लाईफटाइम सदस्य असल्याच्या नात्याने मी हे सांगू इच्छितो की खरा कॉन्टेन्ट सोशल मीडियावरील पोस्ट नसून त्या पोस्टवरील कॉमेंट्स असतात. पण गेल्या काही वर्षात कॉमेंट्सचा दर्जा अतिसामान्य आणि फारच कंटाळवाणा झाला आहे. ईमोजी/स्टिकर इत्यादीच्या अतिवापरामुळे सविस्तर कॉमेंट्स लिहिण्याची कला नामशेष होईल की काय असं वाटतं. 'वक्र'च्या जुन्या सदस्यांना आठवत असेल, 10-12 वर्षांपुर्वी इ-सकाळच्या 'मुक्तपीठ' या सदराखाली येणाऱ्या लेखांवर कॉमेंट्सने धुमाकूळ घातला होता. सकाळच्या वेबसाईटवर पब्लिश होणारे लेख हे फक्त कॉमेंट्स वाचण्यासाठी आहेत की काय इतक्या कॉमेंट्स त्यावर येत असे, त्यात 'मुक्तपिठ'ची तर बात औरच! 'ललित' प्रकारात किंवा 'प्रवासवर्णन' म्हणून लिहिले जाणारे लेख तसे साहित्यिकदृष्ट्या फारच बाळबोध असायचे, पण मजा यायची त्यावरील कॉमेंट्स वाचताना. प्रत्येक लेखाची कॉमेंट्सने केलेली चिरफाड पाहून लेखकाने पुन्हा काही लिहिलं नसेल तर आश्चर्य वाटू नये. तसंच काहीतरी चालायचं क्रीकइन्फोवर - क्रिकेटची ओजी लाईव्ह स्कोरिंग वेबसाइट. त्याव...

फ्रॉम (FROM)

जगाच्या नकाशावर कुठेच नसलेलं एक गाव. त्या गावात रस्ता चुकून आलेले आणि अडकलेले लोकं. गावाबाहेर जात असले तरी पुन्हा गोल फिरून गावात आणणारे चमत्कारिक रस्ते. रात्री घराबाहेर जमणारे मानवसदृश अजब क्रिएचर्स. गावातील लोकांची रोज जगण्याची तगमग आणि तेवढीच अनिश्चितता. प्रत्येक एपिसोडमधून गावाच्या आणि क्रिएचर्सबद्दल उलगडत जाणारी गूढता. पण झालेल्या उलगडेतून पुन्हा उभे राहणारे नवीन प्रश्न! असं साधारण स्वरूप आहे प्राईम व्हिडिओवरच्या फ्रॉम(FROM) या वेबसिरीजच. सिरीजचं नावच अर्धवट वाटतं. From where , From what. नावातच इतकं रहस्य आहे की कथेमध्ये रहस्येचा खजाना आहे. लॉस्ट टीव्ही सिरीज ज्यांना आवडली होती त्यांना ही सिरीज नक्की आवडेल, लॉस्टच्याच लेखकांनी ही सिरीज लिहिली आहे, त्यामुळे लॉस्टसारखंच रहस्य उलगडायला 5 ते 6 सिझिनची वाट पहावी लागेल एवढं मात्र नक्की! - धीरज

कलकी 2898 एडीची रेसीपी

डिस्टोपिअन फ्युचरच्या कुकरमध्ये स्टार वॉर्स आणि डुनचे डाळ-तांदूळ टाका,  ब्लेडरनरचे आणि मॅट्रिक्सचे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या, चवीनुसार अवतार आणि क्रीशचे मीठ टाका आणि महाभारताच्या मंद आचेवर 3 तास शिजू द्या आणि अवेनजर्स एंडगेमची एक छानशी शिटी घेऊन गॅस बंद करा. या अशा खिचडीचा प्रभासच्या ओव्हरएक्टिंगच्या गुळचट लोणच्यासोबत आस्वाद घ्या!

इंटरनेटच्या मंथनातून निघालेली रसायनं

अगणित न संपणाऱ्या साखळीप्रमाणे येत जातात रीळमागे रीळ..  एका यंत्राप्रमाणे सरकवत असतात त्यांना हाताची बोटं... विसर पडतो आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा तीस सेकंदातच... पुसली जाते विस्कटलेल्या जीवनाची "स्टोरी" 24 तासात पुन्हा न कधीच दिसण्यासाठी... दुसरीकडे, पहाटेच्या निरव शांततेला चिरत व उगवत्या सूर्याच्या सोबतीने उपदेशाचं भांडार घेऊन येतो "शुभ सकाळ" मेसेज... लावले जातात स्टेटसवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर... दोन्ही हातांचे अंगठे जुंपले जातात दिवसभर टक-टक करण्यासाठी... शब्दांना वाळीत टाकून इमोजीने व्यक्त होत असतात भावना.. अन फिरत असतात खरकट्या ज्ञानाच्या निनावी पोस्ट एका ग्रुपच्या उकिरड्यातुन दुसऱ्या ग्रुपच्या उकिरड्यावर... आणि, उद्विग्न लेखक मांडत असतात विखारी विचार त्यांच्या भिंतींवर सहस्त्र अंगठ्याची चिन्हं मिळविण्यासाठी... शाब्दिक चकमकीत होत असतात बेजार रोज बैचेन आत्मे... "लाइव्ह" करून दाखवला जातो जिवंत असण्याचा पुरावा... हे मार्केश्वरा, या फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सअप्पच्या मायावी त्रिभुवनात आम्हास कैद करून तू कोणत्या विश्वात डिटोक्स होत आहेस रे! इंटरन...