'धाव'पळ'
संपल्यात हद्दी, संपल्यात वाटा, कितीही धावता, मी दमलोच नाही; धावण्याचा असा उन्माद झाला, बाकी आमिषास, मी भ्रमलोच नाही; असा झिजला देह, नाही उरले त्राण, कुठल्याही त्रासास, मी नमलोच नाही; नसे मनात काही, कुठलीच स्पर्धा, कुणा हरविण्या, मी रमलोच नाही; ध्येय गाठूनी आजचे, पुन्हा सुरुवात, धावण्यास ध्येयामागे, मी थांबलोच नाही. - धीरज (१७-०९-२०२५)