Posts

Showing posts with the label review

फ्रॉम (FROM)

जगाच्या नकाशावर कुठेच नसलेलं एक गाव. त्या गावात रस्ता चुकून आलेले आणि अडकलेले लोकं. गावाबाहेर जात असले तरी पुन्हा गोल फिरून गावात आणणारे चमत्कारिक रस्ते. रात्री घराबाहेर जमणारे मानवसदृश अजब क्रिएचर्स. गावातील लोकांची रोज जगण्याची तगमग आणि तेवढीच अनिश्चितता. प्रत्येक एपिसोडमधून गावाच्या आणि क्रिएचर्सबद्दल उलगडत जाणारी गूढता. पण झालेल्या उलगडेतून पुन्हा उभे राहणारे नवीन प्रश्न! असं साधारण स्वरूप आहे प्राईम व्हिडिओवरच्या फ्रॉम(FROM) या वेबसिरीजच. सिरीजचं नावच अर्धवट वाटतं. From where , From what. नावातच इतकं रहस्य आहे की कथेमध्ये रहस्येचा खजाना आहे. लॉस्ट टीव्ही सिरीज ज्यांना आवडली होती त्यांना ही सिरीज नक्की आवडेल, लॉस्टच्याच लेखकांनी ही सिरीज लिहिली आहे, त्यामुळे लॉस्टसारखंच रहस्य उलगडायला 5 ते 6 सिझिनची वाट पहावी लागेल एवढं मात्र नक्की! - धीरज

कलकी 2898 एडीची रेसीपी

डिस्टोपिअन फ्युचरच्या कुकरमध्ये स्टार वॉर्स आणि डुनचे डाळ-तांदूळ टाका,  ब्लेडरनरचे आणि मॅट्रिक्सचे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या, चवीनुसार अवतार आणि क्रीशचे मीठ टाका आणि महाभारताच्या मंद आचेवर 3 तास शिजू द्या आणि अवेनजर्स एंडगेमची एक छानशी शिटी घेऊन गॅस बंद करा. या अशा खिचडीचा प्रभासच्या ओव्हरएक्टिंगच्या गुळचट लोणच्यासोबत आस्वाद घ्या!

Dune. एका वाळवंटाची दंतकथा.

इसवी सन १०१९१.  दुरदूरपर्यंत वाळवंट असणारा ग्रह अराकीस, डूनच्या विश्वात अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या अराकीसच्या वाळवंटाच्या वाळूतील "स्पाइस", या स्पाइसमुळे निळसर झालेल्या डोळ्यांचे फ्रेमन लोक, वाऱ्याच्या वेगाने सळसळत वाळवंटात फिरणारे अवाढव्य सँडवोर्म. या ग्रहावर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन घराण्यात चालणारं राजकारण आणि त्यातुन होणारे युद्ध, बेनी गेसेरिट नावाच्या स्त्रियांच्या गटाने फ्रेमन आणि एकंदर पूर्ण विश्वावर ठेवलेला धर्माचा पगडा, या अशा डूनच्या विश्वात येतो पॉल अट्रेडीझ. फ्रेमन लोकांनी मानलेला मसीहा. एक युगप्रवर्तक. वाळवंटाचा राजा. फ्रेमनचा अल-माहदी. मुआदीब उसुल, याच विश्वात असते बेनी गेसेरिटने पसरवलेल्या धर्माचा धिक्कार करणारी, मसीहाच्या आख्यायिका न मानणारी. पण पॉलवर जीवापाड प्रेम करणारी, फ्रेमनच्या सैन्यात लढणारी. रणांगिनी चानी. Denis Villeneuveने जे डुनच विश्व उभं केलंय ते Game Of Thrones आणि Star Warsच्या तोडीचं आहे. एकदा या विश्वाची सफर घ्यायलाच पाहिजे! - धीरज (०४-०३-२०२४)

लोकी. एक शापित देव.

मार्व्हलच्या कल्पोकल्पित विश्वातील एक गूढ आणि रंजक पात्र. ऍसगार्ड या जगाचा राजा व युद्धदेवता ओडिनने दत्तक घेतलेला पण आपल्या मुलासारखा वाढवलेला हा लोकी. मेघदेवता असलेला त्याचा भाऊ, थॉरबद्दल त्याला नेहमीच असूया असते. एकीकडे थॉर ताकत वाढविण्यात भर देत असतो तर लोकीची मदार असते जादुई शक्ती प्राप्त करणे व फसवणूक किंवा लबाडीने समोरच्याला नामोहरम करणे यावर. म्हणूनच त्याला "गॉड ऑफ मिसचीफ" म्हणून ओळखले जाते. क्षणार्धात रूपं पलटणे, समोरच्याच्या मनावर ताबा मिळवणे अशा काही शक्ती तो बाळगून असतो. मार्व्हलच्या सुरुवातीच्या सिनेमांत लोकी एक उथळ, सत्तापिपासू ,मत्सरी, कपटी खलनायक म्हणून समोर येतो; थॉरऐवजी ऍसगार्डचा राजा होण्यासाठी वेगवेगळे कट आखतो पण नंतर हाच लोकी आपल्या भावासोबत थॅनोसविरुद्ध लढतानाही दिसतो आणि शेवटी थॅनोसच्या हातून मरण पावतो. तेव्हा लोकी कसाही असला तरी थोडंतरी वाईट वाटतच आणि कित्येकदा मृत्यूचं ढोंग केलेला लोकी आताही असंच काहीतरी करत असणार असं वाटत राहतं पण यावेळी तो खरंच काळाच्या पड्याआड गेलेला असतो. लोकी या पात्राची खरी बाजू उलगडून निघते ती डिस्नीने 2 भागात आणलेल्या "लोक...

डार्क

डार्क. जवळपास दीड डझन पात्र. प्रत्येक पात्राचे 3 टाइमलाईनमधील वेगवेगळे रूप. सर्व पात्र एकमेकांशी नात्याने किंवा प्रसंगाने जोडलेले. त्यात काहीएक पात्र टाइमट्रॅव्हल करून एकतर भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकलेले. रहस्यमयी धार्मिक व फिलॉसॉफीकल अंडरटोन. Inception, Primer सारख्या सिनेमांची गुंतागुंत बाळबोध वाटावी इतकं कॉम्प्लेक्स कथानक. सायन्स-फिक्शन व थ्रिलरशिवाय अधूनमधून डोकावणारा हॉरर व सुपरनॅचरल genre. ही आहे थोडक्यात ओळख नेटफलिक्सच्या वेब सीरिज 'डार्क'ची. एकदा का तिच्या काळोखात हरवला की बाहेर येणं कठीण! बघा एकदा आजमावून! धीरज