Posts

Showing posts from 2016

काश तुम जितना प्यार मैं तुमसे कर पाउ

काश तुम जितना प्यार मैं तुमसे कर पाउ हरदम प्यार के गीत तुम्हारे लिए गा पाउ लहरो की धुन सुनाई ही आज प्यार की खुद की धुन सूना पाउ दिया जलता है अँधेरा मिटाने के लिए कभी तुम्हारी जिंदगी का अँधेरा मैं मिटा पाउ रंगो से है तुम्हे लगाव बहोत जिंदगी में तुम्हारे पसंद के रंग भर पाउ समां बन जाता है आशियाना तुम्हारे होने से कभी ये समां मस्ताना मैं कर पाउ शब्दों में डूबा रहता हु में सदा कभी मेरे कविता ओ से तुम्हे खुश कर पाउ - धीरज (10-12-2016)

मित्र

आयुष्यात आनंदाचा येणारा पुर म्हणजे मित्र गाणं महंताना बिघडलेला सुर म्हणजे मित्र फड़फदत आकाशात उडणारा पक्षी भूर मित्र उदास मनाला प्रफुल्लित करणारा नूर म्हणजे मित्र कधी चंचल तर कधी स्तब्ध म्हणजे मित्र कधी स्वछंद तर कधी बंदिस्त म्हणजे मित्र खोटा नसतोच कधी तो जळजळत सत्य म्हणजे मित्र कधी कविता तर कधी कवितेतला शब्द म्हणजे मित्र - धीरज (10-12-2016)

ती

'तिची' आणि माझी पक्क गांठ देवानेच जणू बांधली होती जन्मापासूनच 'ती' आयुष्यात आली होती होती जरी 'ती' शाळेत पण नाही कधी दिसली सरांनी 'अ' मधून 'ड' मधे टाकलं तेव्हा खरी 'तिची' ओळख झाली 'तिचा' बोलबाला असा काही सर्वत्र सवंगडीं मधेही मतभेद वाढले भरली मनात सर्वांच्या अशी जणू 'ती' कमावले काही मित्र तर काही गमावले लहानाचे मोठे होता पड़े एकच प्रश्न बघणाऱ्याच्या नजरेत अन् वाणीत माझ्यापेक्षा 'तिचं' का अधिक महत्व? टोमणेही 'तिच्या' नावाचे बऱ्याचदा सहन केले 'तिच्या' बद्दलच्या अभिमानाचे कितेकदा दहन केले वाटते पळून जावे 'तिच्या'पासून दूर कुठेतरी अनोळख्या प्रदेशात जिथे फ़क्त लोकांना 'मी' दिसेल माझ्यात अन् माझ्या नावात 'ती' जोडली गेलिये नावासोबत कायमचीच 'तिचं' अस्तित्त्व पुसता येत नाही मी जगलो, मेलो किंवा गेलो कुठेही 'ती' मात्र मला सोडून 'जात' नाही - धीरज (१०/०५/२०१६)

लाज

पितोस पाणी बिस्लेरीचे फ़क्त विरघळलेल्या संवेदनांसकट... जाणिवा अन् नेणीवांच फड़कं करुन धूतो गाडी आजही... सहानुभूति वाहून जाते रोजच शॉवरच्या पाण्यासोबत गटारीत... आणि पैश्याच्या लख्ख प्रकाशात कधी दिसत नाही तुला गळका नळ... तरीही... रणरणत्या उन्हात आटलेल्या आसवांसह पाण्याचा हंडा घेऊन जाणाऱ्या चिमुरडीला टीव्हीवर पाहत 'अरेरे' करताना तुला जराही लाज वाटत नाही? - धीरज (05-05-2016)

दांभिकता

सात वाजता उठून 'बिचारा' जातो फॅट जाळण्यासाठी जिमला गाडीवर... आणि आल्यावर नाश्ता करतो चीज टोस्ट चा... ब्रश करता करता हळहळ व्यक्त करतो बातमीवर 'लातूरला १० दिवसाआड पाणी' तेव्हा गरम पाण्याचा बाथटब overlfow होत असतो बाथरूम मध्ये... युद्धयाला निघण्याच्या अविर्भावात जातो ऑफिस ला 'कष्ट' करण्यासाठी AC च्या हवेत आरामदायी खुर्चीवर बसून caffeine च code मधे रुपांतर करण्यासाठी, व्यस्त असतो ऑफिस गॉसिपमध्ये "यंदा ५०,००० च बोनस दिला म्हणून" घासाघीस सर्रास करतो बाजारामध्ये भाजी ५ ने महाग आहे म्हणून... लंच च्या चर्चेत भ्रष्ट्राचार आणि सरकावर वर करतो घणाघाती हमला सोयीस्करपणे विसरून जातो कालच चिरीमिरी दिलेली ट्राफिक हवालदारला... रात्री 'दारू पिणे हानिकारक आहे' ची जाहिरात टीवी वर पाहता पाहता २ पेग विस्की चे मारतो आणि बायकोला लोकांच्या 'दांभिकतेचे' किस्से सांगत झोपी जातो - धीरज कासार (१९ मार्च २०१६)