एका पार्टीची गोष्ट
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात Engg. च शेवटचं वर्ष सुरु झाल. त्याचबरोबर प्रत्येकाला placement ची चाहूल लागली. आमच्या group मधे सर्वप्रथम कोण placed होईल याची group मधल्या प्रत्येकाला उत्सुकता होती. बऱ्याच Company ची apti. दिल्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आमच्या group चा placement चा नारळ फुटला; अनिकेत जोशी हा सदाशिव पेठेतील देशस्थ placed झाला होता. आमच्या group मधे आनंदाचं वातावरण होत. कारण अनिकेत placed झाला म्हणून नाही तर आमचीही जोरदार पार्टी होईल म्हणून. परंतु या आनंदावर १-२ दिवसांत लगेच विरजण पडलं. CGPA ९.२ असलेल्या अनिकेतने midsem exam आणि endsem exam च कारण देऊन डिसेम्बर मधे पार्टी द्यायचं ठरवलं. End semister Exam होईपर्यंत आमच्यातील बरेच जण placed झाले होते. पण प्रत्येकाची पार्टी वेगळी असेल आणि placed झालेल्या क्रमाने असेल असा आम्ही ठरवले होते. म्हणून अनिकेत कधी पार्टी देतो उंची आम्ही अधीरतेने वाट पाहू लागलो. End Sem exam संपून १५ दिवस झाले तरी अनिकेत ने पार्टी च नाव काढलं नव्हत. पण अचानक एक दिवस सूर्य पश्चिमेकडून उगवावा अस घडलं. अनिकेतने “रविवारी पार्टी” असा sms केल...