'धाव'पळ'

संपल्यात हद्दी, संपल्यात वाटा,
कितीही धावता, मी दमलोच नाही;

धावण्याचा असा उन्माद झाला,
बाकी आमिषास, मी भ्रमलोच नाही;

​असा झिजला देह, नाही उरले त्राण,
कुठल्याही त्रासास, मी नमलोच नाही;

​नसे मनात काही, कुठलीच स्पर्धा,
कुणा हरविण्या, मी रमलोच नाही;

ध्येय गाठूनी ​आजचे, पुन्हा सुरुवात,
धावण्यास ध्येयामागे, मी थांबलोच नाही.

- धीरज (१७-०९-२०२५)

Comments

Popular posts from this blog

Running dilemma

नाशिकचा रिक्षावाला