Posts

Showing posts from September, 2011

नाशिकचा रिक्षावाला

नोट: सदर लेखातून कोणत्याही रिक्षावाल्याच्या किवा तत्सम व्यक्तींच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. निव्वळ निरीक्षणात आलेल्या काही बाबी मांडण्याचा एक प्रयत्न मी करत आहे.             ‘नाशिकचा रिक्षावाला’ असे शब्द कानावर पडताच, माझ्या डोळ्यांसमोर मोठ्या आवाजात वाजणारी गाणी, अलिशान आणि रंगीबेरंगी sit असलेली, समोरील काचेवर कोणत्यातरी पक्षाच्या अध्यक्षाचा फोटो असलेली रिक्षा; आणि लालभडक शर्ट , monkey wash(wash जरा जास्तच हं!) पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची जीन्स व paragon ची slipper घातलेला, गळ्यात ब्लेड किवा बंदूक असलेली चैन , एका हातात सलमान styleच braslet आणि दुसऱ्या हातात खूप साऱ्या देवांचे ताईत असलेला, china mobile वर गाणी वाजणारा रिक्षावाला उभा राहतो.              नाशिकच्या रिक्षावाल्यांमध्ये पंचविशीच्या आसपासचा तरुण मोठ्या प्रमाणात दिसतो. हा रिक्षावाला एका राजकीय पक्षाचा सच्चा पुरस्कर्ताही असतो. रिक्षातल्या एका side mirror वर त्या पक्षाचा लहानसा झेंडा फडकत असतो. या राजकीय ‘संबंधां’चा परिणाम की काय... त्याच्या बोलण्यात ‘भाऊ...

तू...

तू... रानफुलांच्या गर्दीत गुलाबाची पाकळी तू... सरून गेल्यावर रात आलेली पहाट कोवळी तू... नाजूक स्पर्शाचं मोरपीस मखमली तू... पक्ष्यांनी केलेलं गुणगान कातरवेळी तू... तार सप्तकातील धुंद करणारी धून निराळी तू... पावसाचे टपोरे थेंब तर कधी रिमझिम सरी तू... खुळ्या मनात उरलेली एक आठवण खुळी -     धीरज (१८-१०-२०१०)