विरह
श्वास तुझा मज ओठांना स्पर्शलेला अजुनही आहे हृदयी साठवलेला चेहरा तुझा सुंदरतेने नटलेला अन् किंचित लाजलेला नयनी आहे माझ्या वसलेला क्षण अन् क्षण तुझ्यासंगे सरलेला मनात आहे माझ्या कोरलेला डोळ्यातील तुझ्या मूक आक्रोशाला मी विसरू न शकलेला दूर जातांना पाहून तुला मी आसवांनी चिंब भिजलेला - धीरज (२०-२-२०१०)