To be or not to be that's the question, पळावे की नाही पळावे हा एकच सवाल आहे, टाऊनस्क्रिप्टच्या उकिरड्यावर शोधत रहाव्यात नवनवीन मॅरेथॉन इव्हेंट्स बेशरम लाचार आनंदाने, की फेकुन द्यावे ते बीब, गुडी बॅगमध्ये गुंडाळलेल्या टीशर्टसह, कचर्याच्या टोपलीत आणि विसरून जावे सर्व इवेंट्स, मुंबईचे, दिल्लीचे आणि पुण्याचेसुद्धा...! इंजुरीच्या महासर्पाने असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या इवेंटचा विसर पडावा कायमचाच, पण मनातल्या रनरलाच PB ची स्वप्न पडू लागली तर...? इथेच मेख आहे... नवीन रेकॉर्ड करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो रात्रीच जागेपण, सहन करतो इझीच्या नावाखाली होणारे रविवारचे लाँग टेम्पो रन, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने पायांवर होणारे अत्याचार, गार्मिनच्या अल्गोने सत्वाची होणारी रोज विटंबना, आणि अखेर खूप साऱ्या इंजुरी घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आपल्याच कोचच्या दाराशी! विधात्या, तू इतका कठोर का झालास, एका बाजूला ज्यांना इंस्टावर फॉलो करून आम्ही रनिंग सुरू केली, ते जिमर झाले, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या नंतर रनिंग सुरू करणारे अल्ट्रा करू लागले, तर स्ट्रावाच्या विस्कटलेल्या शेकडो ॲक्...