Posts

Showing posts with the label कविता

असंच

कधी नव्हे ते आज शब्दांशी हितगुज करता, कवितांची रिमझिम सुरू झाली; भिजलेले शब्द नकळत, मनाच्या कानाकोपऱ्यातून वाट काढत, वाहत, आठवणींच्या नदीकाठी केव्हा जाऊन पोहचले कळलेच नाही! - धीरज

इंटरनेटच्या मंथनातून निघालेली रसायनं

अगणित न संपणाऱ्या साखळीप्रमाणे येत जातात रीळमागे रीळ..  एका यंत्राप्रमाणे सरकवत असतात त्यांना हाताची बोटं... विसर पडतो आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा तीस सेकंदातच... पुसली जाते विस्कटलेल्या जीवनाची "स्टोरी" 24 तासात पुन्हा न कधीच दिसण्यासाठी... दुसरीकडे, पहाटेच्या निरव शांततेला चिरत व उगवत्या सूर्याच्या सोबतीने उपदेशाचं भांडार घेऊन येतो "शुभ सकाळ" मेसेज... लावले जातात स्टेटसवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर... दोन्ही हातांचे अंगठे जुंपले जातात दिवसभर टक-टक करण्यासाठी... शब्दांना वाळीत टाकून इमोजीने व्यक्त होत असतात भावना.. अन फिरत असतात खरकट्या ज्ञानाच्या निनावी पोस्ट एका ग्रुपच्या उकिरड्यातुन दुसऱ्या ग्रुपच्या उकिरड्यावर... आणि, उद्विग्न लेखक मांडत असतात विखारी विचार त्यांच्या भिंतींवर सहस्त्र अंगठ्याची चिन्हं मिळविण्यासाठी... शाब्दिक चकमकीत होत असतात बेजार रोज बैचेन आत्मे... "लाइव्ह" करून दाखवला जातो जिवंत असण्याचा पुरावा... हे मार्केश्वरा, या फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सअप्पच्या मायावी त्रिभुवनात आम्हास कैद करून तू कोणत्या विश्वात डिटोक्स होत आहेस रे! इंटरन...

म्हणलंय बरं का...!

दिवसामागून दिवस जाती वर्क फ्रॉम होमचे बाई दिवसरात्र डोळ्यांसमोर लॅपटॉपची रोषणाई सुट्टी उरली नावापुरता घरातून बाहेर ना जाई अमेझॉन आणि नेटफ्लिक्स पाहण्याशिवाय अन काही कामच उरले नाही - धीरज (02/04/2021)

Coding Dilemma

To be or no to be that is the question PR merge करावी की नाही हां एकच सवाल आहे Github च्या उकिरड्यावर open करावी खरकट्या कोडफिक्स ची PR बेशरम लाचार आनंदाने की जोडून द्वावी branch मास्टरला त्यात गुंडाळलेल्या commits सह git merge कमांड ने terminal च्या काळ्याशार डोहातून आणि करावा कोड merge माझा .. तुझा ... याचा आणि त्याचा सुद्धा Status 404 रूपी महासर्पाने cody ला असा दंश मारवा की नवीन PR ला नसावा lockit च्या भीतिचा किनारा कधीही पण डेव्हलपर लाच कोडी आणि lockit ची स्वप्न पडु लागली तर तर इथेच मेख आहे नव्या प्रोसेस च्या अनोळखी प्रदेशात जाण्यास धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो रात्रिच जागेपण सहन करतो TC च्या failures ने मास्टर वर होणारे अत्याचार Jenkins च्या गाभारयात specs ची विटंबना आणि शेवटी खालच्या मानेने येऊन उभे राहतो पुन्हा second level reviewer च्या दारात गीटहबा , तू इतका कठोर का झालास रे एका बाजूस आम्ही ज्यांचे कोड रिव्यु केले ते आम्हाला विसरले आणि दुसऱ्या बाजूस आमचा कोड रिव्यु करणारे rework request टाकून मोकळे झाले तर विस्कटलेल्या, conflicts ने भरलेल्या commits ची ही ब्रांच घेऊन ह...

अदभूत ती

तुला बघता ओढ़ असते तुझ्या स्पर्शाची सरसावलेल्या हातांना... बिलगता तू ओठांना सळसळते वीज देहातून... डोळे बंद होतात गच्च... कोलाहल माजतो डोक्यात... झंकारु लागतं अंग अंग... उफाळलेल्या भावनांना आवेश येतो... आणि तुला उपभोगता एका क्षणी थंडावतो आत्मा... शमते शरीरातील आग... डोकं हलकं होऊन फिरू लागते... मग फ़क्त पड़ावसं वाटतं एका स्थिर बिंदुकड़े बघत... ये मदिरे, ये शांभवे, फ़क्त वासाने पंचन्द्रियांना आनंद देणारी तू, अद्भूत आहेस गं... प्रत्येक घोटासोबात आठवणीच्या पटलावरील धूळ सारतेस, अन् दाखवतेस कडू-गोड अनुभवांची चित्रफित... तुझी सखी जळते, राख होते, मला आनंद देण्यासाठी... पण त्या धुराळ्यात फ़क्त ठसका लागतो, अन् तुझ्या रसात नशा चढतो... अगं, तुझ्यापासून दूर जाण्याच्या विरह वेदना इतक्या तीव्र असतील  की दगडाला फुटणाऱ्या पाझराला सुद्धा तुझी चव लागेल!!! - धीरज (27-02-2017)

तुझ्यासाठी

सुर तुझ्यासाठी, संगीत तुझ्यासाठी प्रेमाचे प्रत्येक गाणे तुझ्यासाठी, रात्र तुझ्यासाठी, चंद्र तुझ्यासाठी, आकाशात चमचमणारे चांदणे तुझ्यासाठी, आंनद तुझ्यासाठी जल्लोष तुझ्यासाठी, जगण्याचे हर एक तराणे तुझ्यासाठी, शब्द तुझ्यासाठी, ही कविता तुझ्यासाठी, माझे कवित्वाचे बहाणे तुझ्यासाठी, - धीरज (१७-०१-२०१७)

बेचव प्रेम

तुझ्या प्रेमात मी आकांत बुडालेला, पाकातल्या गुलाबजामसारखा... पाहताच तुला थरथरतो गरम तेलात टाकलेल्या समोस्यासारखा... तू हसताच आइसक्रीम परी विरगळून जातो... तुझ्याशी बोलता शब्दांची भेळ करतो... प्रेमाच्या तीन शब्दांसाठी जिलेबिप्रमाणे गोल गोल वेढे घेतो... पण काय करू आजकाल तुझ्याशिवाय सर्वच बेचव लागतं गं!! - धीरज (22-01-2017)

काश तुम जितना प्यार मैं तुमसे कर पाउ

काश तुम जितना प्यार मैं तुमसे कर पाउ हरदम प्यार के गीत तुम्हारे लिए गा पाउ लहरो की धुन सुनाई ही आज प्यार की खुद की धुन सूना पाउ दिया जलता है अँधेरा मिटाने के लिए कभी तुम्हारी जिंदगी का अँधेरा मैं मिटा पाउ रंगो से है तुम्हे लगाव बहोत जिंदगी में तुम्हारे पसंद के रंग भर पाउ समां बन जाता है आशियाना तुम्हारे होने से कभी ये समां मस्ताना मैं कर पाउ शब्दों में डूबा रहता हु में सदा कभी मेरे कविता ओ से तुम्हे खुश कर पाउ - धीरज (10-12-2016)

मित्र

आयुष्यात आनंदाचा येणारा पुर म्हणजे मित्र गाणं महंताना बिघडलेला सुर म्हणजे मित्र फड़फदत आकाशात उडणारा पक्षी भूर मित्र उदास मनाला प्रफुल्लित करणारा नूर म्हणजे मित्र कधी चंचल तर कधी स्तब्ध म्हणजे मित्र कधी स्वछंद तर कधी बंदिस्त म्हणजे मित्र खोटा नसतोच कधी तो जळजळत सत्य म्हणजे मित्र कधी कविता तर कधी कवितेतला शब्द म्हणजे मित्र - धीरज (10-12-2016)

ती

'तिची' आणि माझी पक्क गांठ देवानेच जणू बांधली होती जन्मापासूनच 'ती' आयुष्यात आली होती होती जरी 'ती' शाळेत पण नाही कधी दिसली सरांनी 'अ' मधून 'ड' मधे टाकलं तेव्हा खरी 'तिची' ओळख झाली 'तिचा' बोलबाला असा काही सर्वत्र सवंगडीं मधेही मतभेद वाढले भरली मनात सर्वांच्या अशी जणू 'ती' कमावले काही मित्र तर काही गमावले लहानाचे मोठे होता पड़े एकच प्रश्न बघणाऱ्याच्या नजरेत अन् वाणीत माझ्यापेक्षा 'तिचं' का अधिक महत्व? टोमणेही 'तिच्या' नावाचे बऱ्याचदा सहन केले 'तिच्या' बद्दलच्या अभिमानाचे कितेकदा दहन केले वाटते पळून जावे 'तिच्या'पासून दूर कुठेतरी अनोळख्या प्रदेशात जिथे फ़क्त लोकांना 'मी' दिसेल माझ्यात अन् माझ्या नावात 'ती' जोडली गेलिये नावासोबत कायमचीच 'तिचं' अस्तित्त्व पुसता येत नाही मी जगलो, मेलो किंवा गेलो कुठेही 'ती' मात्र मला सोडून 'जात' नाही - धीरज (१०/०५/२०१६)

लाज

पितोस पाणी बिस्लेरीचे फ़क्त विरघळलेल्या संवेदनांसकट... जाणिवा अन् नेणीवांच फड़कं करुन धूतो गाडी आजही... सहानुभूति वाहून जाते रोजच शॉवरच्या पाण्यासोबत गटारीत... आणि पैश्याच्या लख्ख प्रकाशात कधी दिसत नाही तुला गळका नळ... तरीही... रणरणत्या उन्हात आटलेल्या आसवांसह पाण्याचा हंडा घेऊन जाणाऱ्या चिमुरडीला टीव्हीवर पाहत 'अरेरे' करताना तुला जराही लाज वाटत नाही? - धीरज (05-05-2016)

दांभिकता

सात वाजता उठून 'बिचारा' जातो फॅट जाळण्यासाठी जिमला गाडीवर... आणि आल्यावर नाश्ता करतो चीज टोस्ट चा... ब्रश करता करता हळहळ व्यक्त करतो बातमीवर 'लातूरला १० दिवसाआड पाणी' तेव्हा गरम पाण्याचा बाथटब overlfow होत असतो बाथरूम मध्ये... युद्धयाला निघण्याच्या अविर्भावात जातो ऑफिस ला 'कष्ट' करण्यासाठी AC च्या हवेत आरामदायी खुर्चीवर बसून caffeine च code मधे रुपांतर करण्यासाठी, व्यस्त असतो ऑफिस गॉसिपमध्ये "यंदा ५०,००० च बोनस दिला म्हणून" घासाघीस सर्रास करतो बाजारामध्ये भाजी ५ ने महाग आहे म्हणून... लंच च्या चर्चेत भ्रष्ट्राचार आणि सरकावर वर करतो घणाघाती हमला सोयीस्करपणे विसरून जातो कालच चिरीमिरी दिलेली ट्राफिक हवालदारला... रात्री 'दारू पिणे हानिकारक आहे' ची जाहिरात टीवी वर पाहता पाहता २ पेग विस्की चे मारतो आणि बायकोला लोकांच्या 'दांभिकतेचे' किस्से सांगत झोपी जातो - धीरज कासार (१९ मार्च २०१६)

बेवडंबन

सादर आहे "उत्तरायण" या चित्रपटातील "धुंद होते शब्द सारे" या गीताचे बेवडंबन (अर्थात, बेवड्या मनाने केलेले विडंबन) टीप: सदर विडंबन त्या गीताच्या चालीत वाचल्यास अधिक परिणामकारक वाटेल. या गीताची चाल आपण विसरले असल्यास अथवा आपणास हे गीत ठाऊक नसल्यास खालील लिंक वर click करावे. http://www.youtube.com/watch?v=obN2Zbx5VEU (माझ्या सर्व बेवड्या मित्रांना स्मरून आणि कौस्तुभ सावरकर(गीतकार) यांची माफी मागून) चिंग होते मित्र सारे पिंगलेल्या रातीला… मित्रासंगे पितांना मी काही केल्या थांबेना… चिंग होते मित्र सारे पिंगलेल्या रातीला… मित्रासंगे पितांना मी काही केल्या थांबेना… दे बिअर अरे… पिउनिया एका घोटात पेला रिक्त मी करी सोबतीला फुंकीतो वीड हे… चिंग होते मित्र सारे पिंगलेल्या रातीला… बिया सारुनी, फाइन करुनी तयार झाला जॉइन्ट हा… बर्फ टाकूनी, कोल्डड्रिंक मिसळुनी बनवला त्याने पेग हा … भावशून्य मन उरलेले, तन माझे झिंगलेले … नशेचा आनंद हा, करी दंग हा, धुंद हा … चिंग होते मित्र सारे पिंगलेल्या रातीला… मित्रासंगे पितांना मी काही केल्या थांबेना… ...

तू गेल्याने

तू गेल्याने.... जग जणू थांबून गेल्यासारख वाटतं, अन् सिगरेटच्या धुरातही मन तुझा चेहरा शोधत तू गेल्याने..... वाराही अवखळ वागतो क्षणोक्षणी तुझा स्पर्श देऊन जातो आणि Rum ही अचानक vodka सारखा लागतो तू गेल्याने.... अश्रूंना वाहायला वाट मिळते, मग neat whisky ही गळ्यातून सहजच उतरते. तू गेल्याने.... सर्व काही सुन्न झाल्यासारखं वाटतं आणि एका सिगरेटच्या kickनेही गरगरतं तू गेल्याने.... मी माझा उरत नाही व भरलेल्या बाटलीतील दारूही उरत नाही. - धीरज (१-१२-२०११)

तू...

तू... रानफुलांच्या गर्दीत गुलाबाची पाकळी तू... सरून गेल्यावर रात आलेली पहाट कोवळी तू... नाजूक स्पर्शाचं मोरपीस मखमली तू... पक्ष्यांनी केलेलं गुणगान कातरवेळी तू... तार सप्तकातील धुंद करणारी धून निराळी तू... पावसाचे टपोरे थेंब तर कधी रिमझिम सरी तू... खुळ्या मनात उरलेली एक आठवण खुळी -     धीरज (१८-१०-२०१०)

विसरणं सोपं नसतं....

विसरणं सोपं नसतं.... कोणालाही.....अगदी 'तिला'ही  खरं पाहता, आपण 'तिला' विसरूच शकत नाही.... 'ती' मनातच कुठे तरी दडलेली असते....  आठवणीच्या गर्दीत हरवून गेलेली असते..... फक्त तिच्या दिसण्याचा अवकाश.... आणि.... सर्व काही डोळ्यांसमोरून जातं.....प्रत्येक दिवस....प्रत्येक क्षण.... इच्छा नसतांनाही तिच्याचभोवती घुटमळत मन.... मग काय..... जुन्या आठवणींचा खेळ सुरु होतो...... त्यातच स्वतःला हरवून बसतो..... पुन्हा.....तीच ती....सगळीकडे..... "तुझ्याशिवाय जगणं कठीण, गडे!" पण हे काही दिवसच टिकतं...... अन् .......बऱ्याच दिवसानंतर ........ पुन्हा नवीन आयुष्य सुरु करण्याची शपथ घेतली जाते.... आणि तिला विसरण्याची तयारी केली जाते..... .........पण........ विसरणं सोपं नसतं.....कोणालाही......अगदी...'तिला'ही                                                          -धीरज(१५-०७-२०११)

Code म्हणजे Code म्हणजे code असतो,

(कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची माफी मागून) Code म्हणजे Code म्हणजे code असतो, लिहिता आला तर ठीक; नाहीतर उगाचीच डोकेफोड असतो काय म्हणालात? code लिहणं तुम्हाला चिल्लर वाटतं, कविता करण्यापेक्षाही थिल्लर वाटतं, मग, तुम्ही code कधी लिहिलाच नाही, मेंदूचा भुगा कधी केलाच नाही, कारण.... Code म्हणजे Code म्हणजे code असतो, लिहिता आला तर ठीक; नाहीतर उगाचीच डोकेफोड असतो first year पासूनच coding चे वारे घुमू लागतात... C, C++, Java classes च्या वाऱ्या सुरु होतात.... if , for , while चा विचित्र खेळ सुरु होतो.... अजून कळलं नाही go to कशासाठी असतो.... complexity सतावते सतत मनाला.... pointers जीव घेतात क्षणाक्षणाला... आठवतं ना? तुमचा-माझा पहिला “hello world” चा code run झाला होता... मित्रांपासून आईपर्यंत सर्वाना दाखवला होता... तेव्हा कुठे माहिती होतं? coding च्या दुनियेत नुकताच प्रवेश झाला आहे... हा तर फक्त उंबरठा ओलांडला आहे.... पण काहीही असो... code run झाल्याचा आनंद अजोड असतो, Code म्हणजे Code म्हणजे code असतो लिहिता आला तर ठीक; नाहीतर उगाचीच डोकेफोड असतो काही जण गोडीने code करतात... तर काही ...

कधी लिहायला लागलो आठवत नाही

कधी लिहायला लागलो आठवत नाही... आठवत इतकंच की... तुझी आठवण येत असे, डोळ्याच्या कडा अलगद पाणावत असे, आणि मनातल्या भावना शब्दात उतरत असे, समजलच नाही... त्या शब्दांनी मिळून कविता होई खरंच, कधी लिहायला लागलो आठवत नाही - धीरज (21-03-2011)

खोटं प्रेम

तू फक्त खोट खोट 'हो' म्हण , मन आनंदाने नाचेल, खऱ्याची सवयच राहिली नाही आता तुझ्या खोट्या प्रेमामुळे तरी मी जगेल धीरज (15-03-2011)

नशेची मजा

रिचवून झाले पेगवर पेग फुंकून झाल्या अनेक सिगारेट मस्त नशा चढली आहे मित्रांनो, अजून एक क्वार्टर उरली आहे तरी नशेतही जाणवतंय tension, घुटमळत आहे मनात फक्त test, placements, detention, ध्येय, लक्ष्य, ध्यास हे शब्द सर्व मनाचेच भास जगाचा एकच formula जो हरला तो संपला पण, मी का करून घेतोय स्वतःला त्रास त्यापेक्षा मित्रा भर तो ग्लास चढू दे आणखी नशा येईल बघ वेगळीच मजा कोणाचीच नसेल तुला भीती आणि डोळे बंद करून बघशील जग फिरत असेल तुझ्याभोवती - धीरज (३१-८-२०१०)