फ्रॉम (FROM)
जगाच्या नकाशावर कुठेच नसलेलं एक गाव. त्या गावात रस्ता चुकून आलेले आणि अडकलेले लोकं. गावाबाहेर जात असले तरी पुन्हा गोल फिरून गावात आणणारे चमत्कारिक रस्ते. रात्री घराबाहेर जमणारे मानवसदृश अजब क्रिएचर्स. गावातील लोकांची रोज जगण्याची तगमग आणि तेवढीच अनिश्चितता. प्रत्येक एपिसोडमधून गावाच्या आणि क्रिएचर्सबद्दल उलगडत जाणारी गूढता. पण झालेल्या उलगडेतून पुन्हा उभे राहणारे नवीन प्रश्न! असं साधारण स्वरूप आहे प्राईम व्हिडिओवरच्या फ्रॉम(FROM) या वेबसिरीजच. सिरीजचं नावच अर्धवट वाटतं. From where , From what. नावातच इतकं रहस्य आहे की कथेमध्ये रहस्येचा खजाना आहे. लॉस्ट टीव्ही सिरीज ज्यांना आवडली होती त्यांना ही सिरीज नक्की आवडेल, लॉस्टच्याच लेखकांनी ही सिरीज लिहिली आहे, त्यामुळे लॉस्टसारखंच रहस्य उलगडायला 5 ते 6 सिझिनची वाट पहावी लागेल एवढं मात्र नक्की! - धीरज